धन्यवाद मंडळी,
इटलीमध्ये चोरीचे प्रकार होतात हे वाचले,ऐकले होते त्यामुळे रस्त्यावरून फिरताना योग्य काळजी घेत होतोच.आणि मागच्या २,३ वेळच्या ट्रिपमध्ये काही वाईट,वाकडे अनुभव आले नसल्याने थोडे बेसावध होतो हेच खरे.त्यातून पाचव्या मजल्यावर खिडकीतून कोणी येऊन आपले सामान चोरेल ही शक्यताच गृहित धरली नाही.
नशिब आमचे की दोन पैकी एकच पोटपिशवी चोरीला गेली,आणि ज्यात क्रेडिटकार्ड,कॅमेरा,भ्रमण्ध्वनी आणि निम्मे पासपोर्ट व पैसे होते ते पाऊच चोरीला गेले नाही! पैसे आणि गॉगल चोरट्यांनी घेऊन बाकीच्या आमच्या वस्तू आणि अत्यंत महत्त्वाचे असे पासपोर्ट परत 'दिले'! अन्यथा प्रसंग आणखी बिकट होता.पासपोर्टचा काळ्या बाजारातील भाव जर्मनीचे रेसिडेन्सी परमिट,स्वीसला जाताना न लागणारा विसा,यु एस विसा इ.मुळे नक्कीच वाढलेला होता,आणि आईचा पासपोर्ट तर ते दोघं भारतात परतायच्या आधी नक्कीच हातात येणे आवश्यक होते.जे काम इथल्या वकिलातीत किती एफिशिअंटली झाले असते याची शंकाच होती!
 भारतीय वकिलातीचा चांगला अनुभव जपान मध्ये आला आहे.पण इथे जर्मनीतील वकिलातीत कामे होत नाहीत हा प्रत्यक्ष आम्हाला आलेला आधीचा अनुभव आणि मेजाखालून व्यवहार चालतात असे ऐकले होते त्यामुळे जास्त धास्तावलो होतो.
येथेही आमच्या मित्रांचे मत पडले की हॉटेलवाले सामिल असावेत आणि ही नक्कीच पहिली वेळ नसावी! एकाने तर असेही सांगितले की जर आमच्या ही गोष्ट लगेच लक्षात आली नसती तर कदाचित पिशवी परत खोलीत सुद्धा मिळाली असती,फक्त पैसे गायब!असो..
आस्थेने दिलेल्या प्रतिसादांबद्दल सर्वांना धन्यवाद!आणि प्रवासात क्षणभरही,अगदी झोपेतही आपापले पासपोर्ट नजरेआड होऊ देऊ नका ही ठळक सूचना.
स्वाती