कसे ते वेड होते, बंध होते, पंखही होते
नदीचा वेग होता सागराचे मैत्रही होते
दुरावे ते क्षणांचे भांडणांच्या त्या खुळ्या गोष्टी
अबोला वाढता पाणावणारे नेत्रही होते
वा अदिती ..... !! बऱ्याच दिवसांनी अशी कविता मिळाली वाचायला. एकदा वाचली, परत वाचावी वाटली, परत परत वाचावी वाटली. अजुनही वाचतोय पण मन भरत नाहिये. उ -- त्त -- म.
आणि अजुन हे पण एक नंबर --
हवे आहेत ते तारे मला माझे पुन्हा सारे
तुझ्या डोळ्यातल्या ज्योती, तुझ्या प्राणातली प्रीती,
(प्रतिसाद विस्कळीत झालाय खरा पण भावना पोचणे महत्त्वाचे)