आम्हाला शाळेत असताना पुरवणी वाचन म्हणून शालेय पुस्तकाव्यतिरिक्त अजून पुस्तके अभ्यासाला असायची. एक वर्ष सुधाकर प्रभुंचे 'आईचा वाढदिवस' हे सुंदर पुस्तक होते. त्यामध्ये दोन बहीणभाऊ आपल्या आईचा वाढदिवस साजरा करायचा ठरवतात. त्यांची परिस्थिती तशी गरीब असते. वडील सैन्यात असताना बेपत्त्ता झालेले असतात, त्यामुळे आई जमेल ती स्वयंपाकाची वगैरे कामे करून मुलांना वाढवत असते. (हे वाचल्यावर मला सुद्धा तेव्हा आमच्या भांडीवाल्या बाईंना 'मला दोन-चार घरी काम मिळवून द्या' असे विचारण्याचा खूप मोह झाला होता )  या दोन्ही साहित्यिकांना सादर प्रणाम.