सर्वांना धन्यवाद.
होय, चिमापुत्रांचे उपद्व्याप शब्दबद्ध होत आहेत. लवकरच तेही तुमच्या भेटीस येतील.
स्मिता, माऊ पाळून बघाच. लळा लागणार यात शंका नाही :)
आणि कोंबडी यांनी म्हटल्याप्रमाणे खरंच ’लो मेन्टेनन्स’ असतो. कोंबडी, तुमच्या प्रस्तावास सरकाराची मंजुरी लवकर मिळो. लगे रहो!
अदिती,
मार्जारविशेषांना मानवी बोली कळत असावी. सततचं कौतुक ऐकूनच तर ती जास्त सोकावतात आणि शेफारतात :)
अत्तानंद,
अनेक धन्यवाद. (मांजर् न आवडूनही लेख वाचला हे वाचून खूप आनंद झालाय)
हॅम्लेट,
सच में आपकी बिल्ली तो साक्षात विश्वसुंदरी लगती है! हिमशुभ्रा दिसतेय...:) बाकी मांजराचा स्वतंत्र बाणा असतो....अगदी पटलं!
शुभा,
मला मनिमाऊ म्हटलं की शाळेत (पेक्षा बालवाडीत) घोकलेलं हेच गाणं कायम आठवतं,
"मनीमाऊ मनीमाऊ
अंग तुझं किती मऊ
डोळे तुझे घारे घारे
मिशीवरुन जीभ फिरे"
बास! पुढचं काहीच आठवत नाही. :)