आपले विचार एकांगी असून तेंडुलकर किंवा अंबानी ही उदाहरणे चुकीची आहेत. धर्म ही एक विचारधारा आहे व एक संस्थापना आहे व समविचारी लोक एकत्र येउन अश्या संस्थेचा पाया रचतात. अश्या ह्या रचनेत काही नियम / मर्यादा मार्गदर्शक तत्त्वे म्हणुन जपली जातात. काळाच्या प्रवाहात काही व्यक्तींनी चुका केल्या असणे शक्य आहे पण त्यावरुन मुळ रचनेच्या अस्तीत्वाला आव्हान देण्याआधी सखोल विचार करणे आवश्यक आहे. तेंडुलकर, अंबानी आणि सामान्य माणूस हा वडील धाऱ्या च्या पाया पडत असेल तर ते धर्म मर्यादेच्या संस्कारानीच. वाढदिवसाला काही लोक केक कापून मेणबती विझवतात आणि आपल्या कडे पणती लावुन ओवाळतात . ह्या दोन्हीच्या मागे वेगळ्या विचारधारा आहेत.
विनम्र