तुझे-माझे फुलांचे ते ऋतू त्या मैफली साऱ्या
जुईचा गंध वाऱ्यातून येताना  नव्या झाल्या
( छान)

कसे ते वेड होते, बंध होते, पंखही होते
नदीचा वेग होता सागराचे मैत्रही होते
दुरावे ते क्षणांचे भांडणांच्या त्या खुळ्या गोष्टी
अबोला वाढता पाणावणारे नेत्रही होते
(सुंदर)

पहाटे कोर चंद्राची दिसावी दूर पूर्वेला
(अतिशय मस्त...चित्रमय ओळ)

दिवास्वप्नातल्या रंगीत शोभा त्या मनोहारी
कशा केंव्हा बुडाल्या सांग ना या घोर अंधारी
नभाच्या सांजरंगांचा पिसारा लोपला कोठे
कधी येतील का हाती पुन्हा आनंद माघारी?
(वा...वा...वा... नभाच्या सांजरंगांचा पिसारा...मस्त)

अदिती, तुझ्या कवितेतील या ओळी खूपच आवडल्या...वृत्तात सफाई तर आहेच...ते तंत्र झाले, पण मंत्रही महत्त्वाचा...वरील ओळी मला अशा मंतरलेल्या वाटल्या ! लेखनाला शुभेच्छा.