आपल्या विचाराशी सर्वप्रथम मी ही असहमत आहे.
अनेक वेळेस झालेल्या चर्चेतील आहे, पण तरी उत्तर देतो...
पुष्क्ळ माणसे आपापल्या धर्माला खुपच महत्त्व देतात.कांही जण तर प्राणाचेही मोल देतात.उदा:-छत्रपती संभाजी महाराज,त्यानी औरंगजेबाकडून हालहाल होऊन मरणे पत्करले पण हिंदूधर्म सोडला नाही. शिवसेना-प्रमुख बालासाहेब ठाकरे ''मी हिंदू आहे,असे गर्वाने सांगायला'' ,सांगतात.धर्माबद्दल कट्टर अभिमान मुस्लिम,ख्रिचन,बौद्ध,शीख,जैन इ. सर्वच धर्माचे अनुयायी जगभर बाळगतात.
संभाजी, बाळासाहेब ह्यांचे वागणे हे तत्कालीन राजनितीशी संबंधीत आहे. राजा कालस्य कारणम या उक्तीप्रमाणे संभाजीने जर असा आदर्श स्वाचरणाने दाखवला नसता तर भारतात पण आज तालीबानच असते. औरंगजेबाला वाटले होते की संभाजीला मारल्यावर मराठ्यांचे राज्य मिळवणे सोपे होईल, पण झाले उलटे, मराठे चवताळून वर आले आणि त्यांनी त्या औरंगजेबाचे तिथेच कंबरडे मोडले - इतके की त्याला परत दिल्लीला जाता आले नाही. मोघलांच्या सत्तेच्या अस्ताची सुरवात झाली. संभाजीच्या धर्मांतराने त शक्य झाले नसते. बाळासाहेबांचे राजकारण पांढरपेशा वर्गाला पटणार नाही/करायला जमणार नाही. मला ते आवडते असे म्हणू शकत नाही पण दुर्दैवाने तसे बोलणारा जर कोणी नसता तर मुंबईचे काही खरे नव्हते असे म्हणावेसे वाटते. विचार करा की आजही बाळ ठाकऱ्यांची लोकप्रियता का टिकून आहे? ती काही नुसती सवंग म्हणून सोडता येणार नाही...सेक्यूलर म्हणत जेंव्हा इतर धर्मांना प्राधान्य आणि बहुसंख्य हिंदूकडे मात्र दुर्लक्ष तेंव्हा "गर्वसे कहो हम हिंदू है" म्हणावे लागले. शहाबानो प्रकरणी जेंव्हा राजीव गांधींना शरीयत ही भारतीय घटने पेक्षा जास्त महत्त्वाची वाटली आणि बहुसंख्येच्या माजाच्या बळावर घटना दुरूस्ती केली तेंव्हा बहुसंख्य "सेक्यूलर" हिंदू समाज हा "गर्वसे कहो हम हिंदू है" म्हणणाऱ्यांच्या मागे गेला.
आंबेडकरांचा राग हा हिंदू धर्मावर नाही पण त्यात आलेल्या अनिष्ठ प्रथांवर होता म्हणूनच त्यांनी भरपूर प्रलोभने येत असूनपण मुस्लीम-ख्रिश्चन धर्मांकडे दुर्लक्ष केले. नुसते इतकेच नव्हे तर, या धर्मांतराआधी घटनेच्या (कितव्या ते लक्षात) नाही पण कलमात त्यांनी बौद्ध धर्म हा भारतीय राज्यघटनेसाठी हिंदू धर्माचाच भाग ठरवला.
आता राहीला प्रश्न आपण ज्या अर्थाने धर्म हा शब्द वापरतो त्याबद्दल: वास्तवीक धर्म म्हणजे आपण जे वागतो ते (धारयती इति धर्म:) असा सरळ अर्थ आहे. धर्म म्हणजे चांगले वागणे आणि अधर्म म्हणजे वाईट वागणे इतके ते अजून सोपे होते. म्हणून गीतेत कृष्णाचे जे प्रसिद्ध वाक्य आहे "यदा यदा ही धर्मस्य..." त्यात त्याने हिंदू अथवा वैदीक धर्म वगैरे म्हणले नाही. अमुकची पूजा केली नाही तर वगैरे म्हणले नाही हे लक्षात घेतल्यास अर्थ समजेल.
आपण जे धर्म वर म्हणत आहात, ते खरे म्हणजे संप्रदाय आहेत. आणि त्यात निधर्मी (नॉन रिलिजीयस) समजला जाणारा कम्यूनिस्ट संप्रदाय पण येतो. वास्तवीक आत्ताच्या घडीला आपण ज्या देशाचे नागरीक आहोत त्या देशाचे चांगले करणे हा हेतू असावा. पण कम्यूनिस्ट हा संप्रदाय असल्याने आधी रशिया आणि चीन आणि आता केवळ चीन त्यांना जवळचे वाटतात. म्हणूनच भारत-चीन युद्धाच्या वेळेस त्यांनी भारताची बाजू घेतली नव्हती - कारण काय त्यांचा संप्रदाय. हाच प्रकार इतर धर्मीयांचा (संप्रदायींचा) कमी जास्त प्रमाणात होतो. कधी रोम तर कधी मक्का जवळ वाटते.
या ठिकाणी दोन गोष्टींसाठी सावरकर आठवताहेत. एक म्हणजे ते म्हणायचे की, "जर जगात इतर कोणीच त्यांचे धर्म पाळणार नसतील तर मला पण हिंदू धर्माचे पडले नाही. पण जो पर्यंत बाकी सारे जग त्यांचे धर्म पाळत आमच्यावर कुरघोडी करायचा प्रयत्न करत आहेत, तो पर्यंत आम्हाला उपदेश करायला येऊ नका". दुसरे म्हणजे की, भारत स्वतंत्र झाल्यावर त्यांचे म्हणणे असे होते की ज्या चळवळी या आपण परकीयाविरूद्ध केल्या त्या स्वराष्ट्रात आपण निवडून दिलेल्या सरकारविरूद्ध, आपल्याच राष्ट्राची घटना न पाळता अथवा कायदे मोडून करणे योग्य नाही. म्हणून त्यांनि अभिनव भारत ही क्रांतीकारी चळवळ अधिकृतपणे बंद केली. गांधीजी पण म्हणाले की "काँग्रेस ही लोकांची ब्रिटीशांविरूद्धची चळवळ होती. आता ब्रिटीश गेले तेंव्हा काँग्रेस विसर्जीत करा'. अर्थातच कॉग्रेस राजकारणी पक्ष आणि संप्रदाय झाला परीणामी संप, मोर्चे, संपत्तीचा निर्माण करण्य्कडे दुर्लक्ष झाले. कम्यूनिस्टांनी तर काय ब्रिटीशांविरुद्ध नसेल इतके स्वतंत्र भारतात सरकार विरूद्ध केले. त्यातून नक्षल चळवळी तयार झाल्या. त्यांचे प्रश्न सुटले नाहीतच पण हिंसा वाढली आणि तशी हिंसा करणाऱ्यांचे स्मारकही करायला या लोकांनी मागे पुढे बघितले नाही. आपण, म्हणता ते हे असले धर्म/संप्रदाय ज्याने आपली वाढ बऱ्याच काळ रोकून धरली होती... सामान्य माणसाच्या धर्माने नाही.
बाकी अभिमानाची गोष्ट - आपल्या आईवडीलांचा, वाडवडीलांचा, सुसंस्कृतीचा आणि देशाचा अहिंसक अभिमान बाळगणे यात काही गैर नाही.सामान्य हिंदू धर्मीय ते करतातच. थोडक्यात काय आहे की आपले हे जे काही पुराण सांगणे आहे, ते आपण जर इतर धर्मीयांना अथवा कम्यूनिस्टांना जाऊन सांगाल तर काय होते ते बघा. इथे मनोगतावर जे कोणी जसा कसा त्यांचा धर्म पाळत असतील अथवा निधर्मी राहत असतील, ते ना धड देशाचे नुकसान करताहेत ना कुणाच्या संपत्तीचे...