आम्हालाही केशवसुमार चावले. म्हणून ही "छत्री"
दोन जणांची अशी असावी छत्री
पाऊस वा उन्हात टिकावी छत्री
दोघांपाशी काही उरले नाही
दोघांमध्ये तरी उरावी छत्री
भेटीगाठी दुर्मीळ जर का झाल्या (चीनी कम)
भेटीसाठी कामी यावी छत्री
चढ-उतार असतातच रस्त्यांमध्ये
कठिण प्रसंगी उलटी व्हावी छत्री
जपायचे या जगात कोणासाठी
जपायचे तर फक्त भिजावी छत्री