सर्व प्रथम ह्या स्तुत्य उपक्रमाबद्दल हार्दिक आभार व अभिनंदन.. लेखमाला छान आहे... पण ह्या दुसऱ्या भागातील गांधींची निंदा अनावश्यक वाटली

मला एक कळत नाही.. हिमालय आणि हिंदु महासागर यांची तुलनाच का?? दोनही गोष्टी तितक्याच अफ़ाट आहेत. एकाचं महात्म्य विषद करताना दुसऱ्याची निंदा हवीच का? 

"गांधी स्वातंत्र्यवादी असाण्या ऐवजी मानवतावादी अधिक होते" अगदी बरोबर.. मग त्यांच्याकडुन झटपट स्वातंत्र्य मिळण्यास पोशक अशी कृती करण्याची अपेक्षाच का? गांधीजी आगरकरांना गुरु मानत आणि कदाचित यातच सारं काही येतं... अशिक्षित, गरीब, अंधश्रद्ध असा अपरिपक्व समाज कदाचित एखाद्या क्रांतिमुळे स्वातंत्र्य मिळवेलही पण असा समाज हे स्वातंत्र्य टिकवु शकेल?? असा त्याचा एकुणच आगरकरवादी विचार असताना ते स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करतीलच कसे..

थोडक्यात सांगायचं तर गांधी हे मुळात स्वातंत्र्यवादी नव्हतेच.. ते जलद मिळणाऱ्या पण अविकसीत समाजाच्या स्वातंत्र्यासाठी लढत नव्हतेच.. केवळ त्यांच्या लोकमान्यतेच्या मोहात पडुन नेहरु आदी राजकारण्यांनी त्यांची समाजसुधारक ही प्रतिमा पुसुन "काँग्रेसी.. राजकारणी" अशी प्रतिमा बनवण्याचा चंग बांधला होता..

एकिकडे नेताजींसारखे लढवैय्ये समाजाला स्वातंत्र्याकडे तर दुसरीकडे गांधींसारखे समाजाला सुधारत होते.. परीपक्व बनवत होते.. त्यामुळे एकाचा जयघोष करताना दुसऱ्या कोणाचीही निंदा करुच नये..

त्यामुळे गांधीनिंदेमुळे एवढ्या छान जमलेल्या मैफ़िलीला एका वेगळंच वळण न लागो ही इच्छा! .. नेताजींचं कतृत्व इतकं दुबळं नक्कीच नाही की ते विषद करायला गांधींच्या निंदेच्या कुबड्यांची गरज भासावी!!