मानसीचा मूल दत्तक घ्यायचा विचार काही चुकीचा नाही पण कशा पद्ध्तीने घेतो आहोत (बरेचसे नातेवाईक तोडून) शिवाय जर मूल नाही तर आयुष्याला अर्थ नाही हा कूठला विचार? ८ मुली च्यावर मुलगा हवा म्हणून नवव्यांदा पण.. हा विचार आणि इतके दिवस झाले मला मुल देत नाही म्हणजे स्व:ताला समजतात काय? घरदार , संसार, नातेवाईक सर्व तोडुन मी एक दत्तक घेऊन येतेच हा विचार?.... दोन्ही वाईट..
माझ वैयक्तीक मत म्हणजे सिंगल पेरेटींग हे त्या पॅरेंट आणी मूल दोघांवर अन्याय (कमनशीब, चुकूनही कोणावर ही वेळ न येवो व ज्यांच्यावर येते त्यांना खूप चांगले कुटुंबीय व मित्रगण मिळावा ) पण असा निर्णय मुद्दामून घेणे हे कुठेतरी चांगलेच खटकते..
मुलाच्या दृष्टीने विचार केला तर वडील, आजी आजोबा नसलेले कूटुंब किंवा हे सर्व असून देखील त्याला मिळू न देणे हे त्या पालकाच्या (थोडातरी र्स्वाथी) निर्णयाचे फ़लीत नाही का?