तुमच्या मताशी अगदी सहमत नाम्याराव,
मला अगदी हेच सांगायचं होतं.
बाका साहेबांचे विचार अगदीच उथळ, पोरकट वाटतात.
धर्मामूळे कुणाच्या आयुष्यात फरक पडला नाही हे विधान बाकासाहेबांनि कशाच्या आधारे केले? शिवाय धर्मामूळे कुणा एखाद्याच्या आयूष्यात फरक पडला नाही म्हणून तो कुणाच्याच आयुष्यात पडणार नाही असं बाकासाहेबांना का वाटतं काही कळायला मार्ग नाही. आमच्या आयुष्यात मात्र बराच फरक पडला. आणि मुख्य म्हणजे चांगला फरक पडला. मग आम्ही आमच्या धर्माचा का म्हणून अभिमान बाळगू नये?
समाजात नैतिकता टिकवून ठेवण्याची फार मोठी ताकद 'धर्म' या संकल्पनेत आहे. कदचित हेच ओळखून जगात विविध प्रांतांत धर्म निर्माण झाले असावेत. कालानुरुप या संकल्पनेत भेसळ होत गेली होत असावी हे मान्य. तसच कदाचित हिंदू धर्माचं देखील झालं असावं. पण म्हणून संपूर्ण हिंदू धर्मालाच दोष देऊन त्याचा त्याग करणे हे काही पटत नाही.
नाम्यारावांनि सावरकरांच्या विचारांचा दाखला दिला हे छान केले. अगदी साधे परंतु अतिशय वास्तव अशा स्वरूपाचे हे विचार वाटले.
रम्या