सर्व शेर उत्तम! वृत्त अगदी सहज आले आहे. वा !!
आभाळा, चमकून का निरखतो आहेस बाबा मला?
माझी झेप स्मरून मीच अजुनी भांबावतो सारखा !
वा! मस्तच.
जुन्या रूपकांची नवी मांडणी आणि वेगळ्या कल्पना यामुळे गज़ल वेगळी वाटते.
काही शंका-
प्रकाशाचे घोंघावणे वेगळे असले तरी कल्पनेसाठी योग्य आहे. (घोंघावणे मध्ये नुसते गोळा होणेच अभिप्रेत नसून ,आवाजही तिथे असणे अभिप्रेत आहे असे वाटते चू.भू. दे. घे. )हेच अभिप्रेत आहे का?
नाही ह्या दुनियेत मित्र अथवा वैरी मनासारखा
कोणी निर्दय एवढा न जपतो, जोजावतो सारखा
या शेरावर उर्दू शायरीचा प्रभाव जाणवतो. शब्दार्थाने मित्रालाही निर्दय म्हणायचे आहे असे वाटते. निर्दय शब्द का वापरला आहे ते समजले तरी तसे करणे पटले नाही कारण त्यात एक अडचण आहे; जपणारा आणि जोजवणारा निर्दय कसा?
मतला शब्दबंबाळ वाटला. समुद्राचे खारावणे, खवळणे... आपल्याकडून यापेक्षा दमदार मतल्याची अपेक्षा ठेवली होती.