धन्यवाद जीजी. प्रकाशाच्या घोंघावण्याबद्दल माझे मतही जवळपास सारखेच आहे. ह्या मनासारखा कुणीच मित्र नाही आणि वैरीही नाही. हा निर्दय आहे तेवढाच मला जपणारा, सांभाळून घेणाराही आहे असे मला म्हणायचे होते. खालच्या ओळीवर उर्दू शायरीचा प्रभाव आहे असे मलाही नंतर वाटले. तसेच मतल्यात वरच्या ओळीत समुद्र असल्याने खालच्या ओळीत खवळणे आणि खारावणे ही क्रियापदे जाणून वापरली आहेत. तुम्हाला शब्दबंबाळ का वाटला ते कळल्यास बरे वाटेल.