दिल्लीत २३ ऑक्टोबर १९१२ ला व्हॉईसरॉयच्या मिरवणुकीवर बोंब टाकल्यावर हाहाःकार उडाला.

इथे नुसता हाहाहाहाहाकार उडाला.

निषेधाचा हा सामान्य प्रकार इतका हाहा:कार (हाहाकार हवे) उडवण्याइतका प्रबळ असेल असे वाटले नव्हते. विशेषतः एवढ्या किरकोळ गोष्टीसाठी सहभागी लोकांस फासावर चढवणारे इंग्रज सरकार खरोखरच निष्ठूर (निष्ठुर हवे) असले पाहिजे.

(एवढ्या महत्त्वाच्या विषयावर लेख लिहिताना शुद्धलेखनाकडे जरा अधिक लक्ष देणे अतिमहत्त्वाचे आहे. नाहीतर असा अर्थाचा अनर्थ होऊ शकतो.)

हेच म्हणायचे आहे. लेखमाला आवडली.

आता एक कुतूहल:

राशबाबू १९१३ साली अमेरिकेत स्थापन झालेल्या गदर उत्थानाच्या कार्यकर्त्यांच्या संपर्कात आले व त्यांनी क्रांतिरत्न हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे, कर्तारसिंह सराबा, सोहनसिंह भकणं यांच्या साहाय्याने बनारस येथे लष्करी छावणीवर हल्ला चढवून सशस्त्र उठाव करायचा असा बेत नियोजित केला.

अधोरेखित, ठळक अक्षरातील आडनावाचा नेमका उच्चार असा करावा?

हेच कुतूहल मलाही आहे.