मानस,
खूपच छान गझल आहे. साध्या शब्दात मोठा आशय आहे. अनुवाद असा उत्तम झालाय की त्याची जाणीवही होत नाही.
घावामागून घाव घातले, त्याबद्दल आभार.
पाषाणाला शिल्प बनवले, त्याबद्दल आभार.
जागत होतो, म्हणून कामे नवी करु शकलो,
हे निद्रे, तू मला सोडले, त्याबद्दल आभार.
आल्या नसत्या तुम्ही; ह्या शिड्या बनल्या असत्या का?
हे भिंतींनो, तुम्ही अडवले, त्याबद्दल आभार.
विशेष आवडले.