मा. टग्या/ चित्त,

आपले चुका दाखवून दिल्याबद्दल आभार, गंभीर लेखनात अशा चुका अक्षम्य आहेत. त्यात शु.चि. ची भर:)

बाँब ची बोंब झाली ती माझ्या निष्काळजीपणाने. मात्र कधी कधी शु.चि. नको ती दुरुस्ती सुचवतो आणि आपले लेखन अशुद्धच त्यामुळे आत्मविश्वासाने आपण त्या दुरुस्त्या स्वीकारत जातो. सरदार सोहनसिंह भकना या नावातील भकना हा शब्द चिकित्सकाला अपरिचित असल्याने बहुधा त्याचे भकणं असे झाले असावे.

असो, याबाबत कोणतीही सबब लागू नाही, यापुढे अधिक काळजीपूर्वक तपासणी केली पाहिजे हे मान्य. संपूर्ण लेख बारकाईने वाचून चुका निदर्शनास आणल्याबद्दल पुन्हा एकवार सप्रेम आभार!