माणूस मांजरांना पाळतो असा एक सार्वत्रिक गैरसमज आहे. ज्याने मांजरे पाळली आहेत त्याला यातील फोलपणा लक्षात यावा. मांजराचा स्वतंत्र बाणा लक्षात घेता बरेचदा माणूस पाळीव प्राण्यासारखा वागत असतो
खरे आहे. कुत्रा आणि मांजर यांच्या स्वभावातील हा नैसर्गिक फरक आहे. माणूस जर कुत्र्याचे एवढे लाड करेल तर कुत्र्याला वाटेल की आपला मालक हा देव आहे. तेच जर मांजराचे केले तर मांजर म्हणेल, माझे एवढे लाड चाललेत, मी नक्कीच देव असलो पाहिजे!