घरी परत आलो. बघतो तर काय माझ्या कॉलेजच्या दोन तीन मित्र-मैत्रिणींनी घरीच डेरा जमवला होता. आपापली कामं सोडून / आटपून केवळ मला निरोप द्यायला ते जमले होते. घरी आई, बाबा, काका, काकू भाऊ असा घरगुती मनातल्या जवळच्या लोकांचा गोतावळा होताच, पण मित्रांना पाहून फार फार बरं वाटलं. एक एक करत बरेच जण जमले.. शेवटी विमान तळावर पोहोचे पर्यंत १५-२० जण मला सोडायला जमले होते.. माझे वेडे मित्र मैत्रिणी.. अगदी माझ्या सारखे.. माझ्याबरोबर सतत असणारे.. मला माझ्यासारखे बनवणारे.. जमेल तसे, मिळेल ते वाहन पकडून अगदी पुण्या-हैद्राबादहुन फक्त मला सोडायला जमलेले.. अगदी वेडे!! माझ्यावर

मी जेव्हा गेलो होतो तेव्हा आमच्या घरी पण हिच स्थिती होती. मुंबई ला विमानतळावर जेव्हा पोचलो होतो तेव्हा मागे न बघता मी पटकन आत गेलो होतो नाहीतर रडलो असतो.....