मराठी चित्रपट आपली हरवलेली प्रतिभा शोधण्यासाठी अथक प्रयत्न करत आहे असेच मला वाटते. त्यासाठी निरनिराळे विषय विविध प्रकारे मांडले जात आहेत. अगदी उदाहरणच द्यायचे असेल तर बिनधास्त, सावरखेड एक गाव सारखे चित्रपट आहेत. वजीर सारख्या चित्रपटातून राजकारणासारखा विषय प्रभावीपणे मांडला गेला आहे. तत्त्वानुसार जगणाऱ्या माणसाची आजच्या या जगात होणारी अवहेलना डोंबिवली फास्ट मध्ये दाखवली आहे. श्वास, बयो, देवराई सारखे अनेक उदाहरणे देता येतील. आणि निखळ मनोरंजन जर हवे असेल तर अग बाई-अरेच्च्या, पछाडलेला, कायद्याच बोला, पक पक पकाक आहेतच की. उलट मराठी चित्रपट सृष्टी एका मोठ्या परिवर्तनाच्या मार्गावर आहे असे मला वाटते.