लेख आवडला.
(विषयांतरासाठी क्षमस्व.) दर पाच सहा वर्षांनी शासनाच्या डोक्यात नव्या नव्या योजना येत असतात. त्यापैकी एक म्हणजे- काही खाजगी महाविद्यालयांना  शासनाकडून मिळणारे अनुदान (५-१०%असले तरी) कायम राहावे म्हणून सर्व शिक्षकांना संगणकाच्या काही प्राथमिक परीक्षा पार कराव्या लागणार होत्या. घरातील संगणकाचा एरवी उपयोग चहाचा कप ठेवणे अथवा धूळ पुसून काढणे याकरताच करणाऱ्या त्या महाविद्यालयातील तज्ज्ञांना संगणकासमोर बसून मान मोडून नव्या गोष्टी शिकाव्या लागल्या.  त्यावेळी आपल्या लेखात आहेत तसेच काहीसे संवाद कानावर येत होते.