खोडसाळपंत,

आपली आणि केशवसुमार यांची विडंबने वाचून आपल्याशीच खळखळून, खुदकन वगैरे जे काही हास्याचे प्रकार असतील ते अनुभवणे हा एक सुखद अनुभव असतो.

रोजच्याच जीवनातील प्रसंग आपण दोघे इतक्या सहजतेने विनोदी शब्दरूपात सादर करता ही आपल्या दोघांवर असलेली प्रतिभेची कृपा आम्हां वाचकांना आल्हाददायी आहे.

मूळ काव्य दुसऱ्या खिडकीत उघडून दोन्ही आलटून पालटून वाचण्यात एक गोडवा आहे. तो प्रत्येक वेळी प्रतिसादातून व्यक्त होईलच असे नाही.

असेच बहारदार वाचायला मिळो आपणा दोघांकडून आणि मनोगत असे बहरलेले राहो.