एखाद्या आवाजावर आणि स्वादावर प्रतिक्रिया देणे आणि युद्धशास्त्राचे धडे शिकणे हे सारखेच आहे यावरही विश्वास आहे हो. प्रश्नच नाही. मी तर म्हणते भारतीय गर्भाचा बुद्ध्यांक पाश्चिमात्य गर्भापेक्षा शेकडोपटींनी जास्त असावा. आम्हाला हजारो वर्षांची संस्कृती आहे ना.
खरंतर एक प्रयोग करून पाहावा. काही गरोदर बायकांनी गर्भारपणात कायद्याची, वैद्यकशास्त्राची, नागरीकशास्त्राची पुस्तके वाचावीत. वयाच्या दहाव्या पंधराव्या वर्षीच डॉक्टर, वकिल, राजकारणी तयार व्हायला हरकत नाही.
या डॉक्टरांचं काही खरं नसतं आज एक सांगतात उद्या दुसरं. आज सांगतिल या वयाच्या मुलांवर दुष्परिणाम होतात, उद्या सांगतिल त्यांच्या पालकांवरच दुष्परिणाम होतात.