गावी गेलो की पायात लुडबुडणाऱ्या मांजराला हाकलणे एवढाच मार्जारकुळाशी संबंध असणाऱ्या माझ्यासारख्यालाही हे तीनही भाग शेवटपर्यंत वाचावेसे वाटले आणि आवडले. सूक्ष्म निरीक्षणे आणि मेंदूपेक्षा मनाने विचार करण्याची वृत्ती खूप आवडली. वर्तमानपत्र जमिनीवर पसरुन वाचणे, मांजराचे चादरीखाली, दप्तरात शिरणे हे खासच. 'टिकलीवाला' चे वर्णन तर 'सदमा' मधल्या श्रीदेवीच्या 'हरीप्रसाद' ला टिकली लावण्याची आठवण यावी असे... (हरीप्रसाद हा कुत्रा असतो हा सूक्ष्म फरक सोडला तर)