नवा प्रयोग - उत्तम कविता. लयबद्ध! एखाद्या लोकगीताचाही बाज आहे.
समसमा संयोग म्हणतात तो हाच!

जगण्याचा एक एक क्षण शिळा झाला
आणला मी ढकलत...इथवर आला...

जाईनच घरी पण माझे कुठे घर ?
पाताळाच्या खाली किंवा
नभाच्याही वर ?

...शिळा क्षण क्षण कुठे ढकलावा मग ?
पाताळाच्या खाली तरी कुठे स्थिर जग ?

कुठे स्थिर जग असे नसतेच मुळी
असे काही असण्याची कल्पनाच खुळी !

अप्रतिम.

नवी कविता फार, फार आवडली.  नव्या प्रयोगांचे स्वागत.