हा भाग विशेष आवडला. चित्रं तर इतकी मस्त आहेत की बास. त्यांच्यामुळे तर लेखाची खुमारी आणखी वाढली आहे. सकाळी उठल्या उठल्या तुमचा लेख दिसला आणि वाचायला सुरुवात केल्यावर एक क्षणही इकडेतिकडे न बघता वाचून काढला. खूप मजा आली.
विशेषतः दोन पायांवर उभे राहून कडी वाजवणारे मांजर फारच मनोरंजक वाटले.
तुम्ही चतरन नावाचा चित्रपट पाहिलाच असेल ना? त्यातलं ते धडपडं मांजर नकळत आठवून गेलं.

मांजरांना पाण्याची भीती असते असं मला का कोण जाणे पण सारखं वाटायचं. पण मांजर या बाबतीत माझ्या बऱ्याच संकल्पना चुकीच्या आहेत असं आता वाटायला लागलंय....
जगात इतकी लोभस आणि प्रेमळ मांजरं सुद्धा असतात हे वाचून खूप छान वाटलं.
असेच आणखी वाचायला आवडेल.
--अदिती