माझ्या अल्पमतीप्रमाणे श्रीकृष्ण काही अभिमन्युचा पिता नाही आणि अर्जुनाने चक्रव्युह भेदण्याचे तंत्र सुभद्रेला सांगितले नव्हते.

आपला काहीतरी गैरसमज झालेला दिसतो. कदाचित अभिमन्यूचा पिता अर्जुन नसून श्रीकृष्ण होता, असे लेखकाला सुचवायचे असावे.

भारतीय इतिहास व सांस्कृतिक ठेवा यांबाबत असेच मौलिक संशोधन होऊन अशी क्रांतिकारी सत्ये उघडकीस आली पाहिजेत. ऐतिहासिक सत्याला सामोरे जाण्याची देशाला आज नितांत गरज आहे.

(कदाचित लेखकाच्या दाव्याप्रमाणे कौरवांच्या गोटाबाहेर चक्रव्यूहभेदाचे रहस्य केवळ या योद्ध्याचा बाप श्रीकृष्ण यासच ठाऊक आहे - पर्यायाने श्रीकृष्ण हाच या योद्ध्याचा बाप आहे - अशी कौरवांना खरोखरच माहिती असावी. कदाचित नंतर पांडवांचा जय झाल्यामुळे आणि जेते हेच इतिहास लिहीत असल्यामुळे ही बाब दडपली गेली असावी. कोणी सांगावे?)

(कृपया मूळ मजकुराचे भाषांतर लिहावे. : प्रशासक)

माझ्या कल्पनेप्रमाणे, कोणत्याही विद्वत्तापूर्ण/माहितीपूर्ण लेखात, प्रबंधात अथवा माहितीची देवाणघेवाण करू पाहणाऱ्या कोणत्याही साहित्यात, उद्धरणे ही मुळाबरहुकुमच असावीत, असा संकेत आहे. किंबहुना मूळ उद्धरणात शुद्धलेखनाच्या चुका असल्या तरी त्या जशाच्या तशा ठेवून त्यापुढे कंसात (sic) असे (मुद्दाम आहे तसे छापले आहे, अशा अर्थाने - या दुव्यावर sicचा तिसऱ्या क्रमांकाचा अर्थ पहावा.) लिहिण्याची प्रथा आहे.

यामागे १. भाषांतर अथवा 'सुधारणा' करताना मूळ लेखनातील एखादी अर्थच्छटा हरवू नये, आणि २. उद्धरणकर्त्याने मूळ लेखकाच्या एखादी विशिष्ट शब्दयोजना करण्यामागच्या हेतूला second-guess (मराठी?) करू नये, असा उद्देश असतो.

मराठीतून लेखन व्हावे यासाठी दहा टक्क्यांहून अधिक अमराठी शब्दांवर निर्बंध घालण्याची संकल्पना कदाचित रास्त असेलही (त्याबद्दल सदर लेखकास शंका असली तरी तो मुद्दा तूर्तास बाजूला ठेवू.), पण असे निर्बंध भलत्या ठिकाणी राबवले जाऊ नयेत, असे वाटते.