संवाद कृत्रिम वाटले. इंग्रजी गोष्टीचे सरळसरळ भाषांतर केल्याप्रमाणे.

अगदी! विशेषतः 'फ्लॉक'चे 'मेंढ्यांचा कळप' हे शब्दशः भाषांतर त्या संकल्पनेचा या संदभातील अर्थ न कळल्यामुळे असावे का?

(पाद्र्याचे रविवारीय प्रवचन ऐकायला वगैरे) एखाद्या चर्चमध्ये नियमितपणे येणाऱ्या ('भक्त')मंडळींना 'फ्लॉक' म्हणतात, अशी माझी समजूत आहे. म्हणजे 'भक्त'मंडळी हा मेंढ्यांचा कळप आणि पाद्री हा त्यांचा 'मार्गदर्शक' 'मेंढपाळ' अशी कल्पना असावी, असे वाटते.

कथाबीज/मूळ कथा चांगली आहे, पण ती तपशील फारसे समजून न घेता शब्दशः भाषांतरित केली असावी, असे वाटते.

अवांतर: आमच्या काळी आमच्या (मराठी माध्यमातल्या) शाळेतल्या इंग्रजीच्या शिक्षिका अशाच अर्धवट ज्ञानावर आधारित इंग्रजी कथा आम्हाला सांगायच्या. अशावेळी मूळ कथेत काय वाटेल ते असो, पण आम्हाला सांगितल्या जाणाऱ्या गोष्टीत प्रमुख पात्रांची नावे ही हमखास पुरुष असेल तर जॉन आणि स्त्री असेल तर मेरी अशीच असायची. पुढेमागे अकरावी-बारावीत गेल्यावर चुकून तीच कथा इंग्रजी या विषयासाठी मुळाबरहुकुम आली, की खरे काय ते कळायचे!