टग्याजी,

फ्लॉक ह्या शब्दाचा उल्लेख माझ्या लिखाणात कुठेही नाही. आणि कुठेही पाद्र्यांशी त्याचा संबंध जोडलेला नाही. माझ्या लिखाणात पेस्टर चा उल्लेख आहे, आणि मी जी काही माहिती ही कथा लिहिण्यापूर्वी शोधली त्यात मला असा उल्लेख आढळला की चर्चच्या मेंढपाळांना पूर्वी पेस्टर म्हणत आणि पुढेपुढे चर्चमधील एका पदाधिकाऱ्याचे नाव ते होवून गेले. पण मला अभिप्रेत असलेला काळ हा आजचा नसल्याने मी जुना अर्थ घ्यायचे ठरवले. असो, आपण दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद.

आणि कथा ही भषांतरित नसून मी स्वतः लिहिलेली आहे. शब्दांची मांडणी मुद्दाम भाषांतरासारखी केली आहे. अर्थात मी स्वतः ख्रिस्ती नसल्याने काही संदर्भ चुकले असण्याची शक्यता आहे. पण यथामति यथाशक्ति मी ते संदर्भ बरोबर असल्याची खात्री करून घेतली होती. अर्थात, आपल्यासारख्या जाणकारांचे मत चुकीचे नसणारच.

आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद, पुढील लिखाणाच्या वेळी सुधारणा करण्याचा प्रयत्न करेन.

- कोहम