वस्तुत: आठ ते सोळा व सतरा ते चोवीस महिन्यांच्या मुलांची बौध्दिक वाढ हा मुद्दा किंवा विषय अधिक विचार प्रवण आहे.
अगदी खरे. गर्भ किंवा शिशु अवस्थेत बालक यथोचित ध्वनि संस्कार ग्रहण करू शकते. याबाबत संशोधन झाले आहे का? मूल प्रतिक्रिया देते, जसे मोठेही एखाद्या रोजच्या आवाजाला किंवा मोठ्या आवाजाला, किंवा मन शांत करणाऱ्या आवाजाला प्रतिक्रिया देतात किंवा चटका बसल्यावर हात मागे खेचला जातो त्याप्रमाणे. त्यात बौद्धिक वाढ आणि संस्कार ग्रहण (८ महिने ते २ वर्षे वयाचे) होते का? आपले यावर वाचन झाले असेल तर कृपया माहिती द्यावी किंवा दुवे द्यावेत. वर दिलेल्या एका दुव्यातील फोलपणा तेथेच दिसला, तेव्हा तसे दुवे नकोत.
या विधानाच्या पुष्टीसाठी दरवेळी अभिमन्यूचाच दाखला द्यावा अशी गरजही नाही.
विषय आठ महिने ते दोन वर्षांच्या मुलांचा चालला होता म्हणून त्याहीपेक्षा लहान अभिमन्यूचे उदाहरण आठवले. यापेक्षा चांगले उदाहरण आठवले नाही त्याबद्दल क्षमस्व!
ज्या घरांत नित्य पूजाअर्चा, प्रकट पठण, सुमधुर संगीताची गायन-वादन, साहित्य कला आदि विषयांची प्रकट चर्चा असे वातावरण असते, त्या घरांतील बालके आपोआपच सुसंस्कारित होतात हा अनेकांचा अनुभव आहे.
१००% मान्य. ज्या घरात असे काही होत नाही आणि वातावरण आनंदी असते त्या घरातील बालकेही सुसंस्कारितच होतात. परंतु ८ महिने ते २ वर्षे याकाळात हे ऐकून त्यांची बौद्धिक वाढ होते असे सांगणारे डॉक्टरांचे दाखले आहेत का? असल्यास वाचायला आवडतील.