धर्म जर मानव निर्मीत आहे तर मग तो बदलला तर बिघडले कुठे? बहुतेक लोक इथे लिहितात की धर्माचा रूढ अर्थ वेगळा आहे, आणि मूळ अर्थ वेगळा आहे. पण जर 'रूढ' इतके वर्ष 'रूढ' आहे तर मग त्याच अर्थाला उद्देशून बोलायला हवे! अन्यथा हे सांगा की जो 'मूळ' अर्थ आहे तो जनमानसात कसा रुजुवाय्चा? जर आजचा धर्माचा अर्थ इतक्या लोकांना एकमेकांविरुद्ध करतो आहे तर मग त्यावर उपाय काय? एक - धर्माचा अर्थ अशा पद्धतीने रुजू द्या की ज्याने सर्व लोक शांततेत जगू शकतील! अन्यथा धर्माचा रूढ अर्थ चुकीचा आहे हे तरी जाहीर रित्या कबूल करूयात ! इथे मूळ मुद्दा धर्माच्या पाठीमागे लागून लोकांनी स्वतःची व इतरांची वाताहत केली आहे त्याला विरोध करणे हा आहे! 'मूळ' अर्थ वेगळा आहे आणि तो कसा छान आहे हे पटवण्याचे मग कामच पडणार नाही!