चर्चमध्ये आज नवीन पेस्टर आलाय, पलीकडचा गावातून. खरंतर मेंढ्या चरायला नेणं हे त्याचं काम. पण आता चर्चामध्ये मेंढ्याच नाहीत.
 
वरील दोन वाक्ये वाचताना कशी काय सुटली. विशेषत: 'चर्चमध्ये आता मेंढ्याच नाहीत' हे भरपूर मनोरंजन आणि टग्यांच्या 'फ्लॉक'ची पुष्टी करणारे. 'स्नेक चार्मर'चे 'सर्पप्रेमी' असे भाषांतर करणारे पत्रकार आठवले.

'पेस्टर' हा उच्चार चुकीचा आहे. 'पास्टर' हा खरा उच्चार. 'पास्टरल' हा शब्द पशुपालनाशी संबंधित असल्यामुळे कदाचित चर्चमध्ये मेंढ्या आल्या  असाव्यात. असो. का/कॅसलहेवन हे

कथाबीज/मूळ कथा चांगली आहे,
आणि कुठेकुठे 'भाषांतरासारखी भाषा' (?) फसली आहे.  असो.  को अहम, प्रियाली आणि टग्यांशी मी जवळपास सहमत. पण मला शेवट भयंकर आवडला.

तात्पर्य: विशेषत: कथा वाचताना, तिला प्रतिसाद देताना घाई करू नये. आणि मराठी माध्यमातला इंग्रजी विषयाच्या शिक्षिकेसारखी 'भाषांतराची भाषा किंवा शैली' असू नये.