इंग्रजी भाषांतराच्या स्वरूपात मूळ मराठी लेखन करण्याची कल्पना आवडली.
त्यात चांगलेच यश आले आहे. त्यामुळे हे लेखकाचे अपयश नसून यशस्वी लेखनप्रयोग म्हणून
कौतुकास्पद आहे.

कथेचे बीजही सशक्त असून वातावरण निर्मिती चांगली आहे.
कथा अजून फुलवता आली असती. भुताटकी दाखवली नाही (मेलोड्रामा) हे चांगले झाले.

कथा मनापासून आवडली.


काही (अनावश्यक) सूचना:
अंधारलेले ग्रेव्हयार्ड, हिरवळीवरून धुक्यात हरवणाऱी पायवाट, पावसाचे टपोरे थेंब, हुडहुडी भरवणाऱी हवा, ग्रेगरीच्या थंडीने थरथरणाऱ्या ओठातली अर्धवट विझलेली सिग्रेट, (ग्रेगरी लांब केस आणि दाढी वाढलेला आहे - मग) केसांतून निथळणारे पाणी, भिजून चिंब झालेली हॅट, त्याचा लांब भिजलेला ओव्हरकोट...
असे वर्णन असते तर आणखी प्रभावी झाले असते असे वाटले.
तसेच, कुदळ न वापरता फावडे वापरले असते तर बरे झाले असते. 'तिकडे' आपल्यासारखा कुदळ हा प्रकार फारसा दिसत नाही आणि ग्रेव्ह खणण्यासाठी पसरट चमच्याच्या आकाराची फावडी वापरतात असा माझा समज आहे. 
याच ग्रेगरीची थोडी विस्तारीत आत्मकथा  (मी... ग्रेगरी) अशा वातावरणात किंवा आणखी काही भाषांतर सदृश भाषेत 'दिवाळी मनोगत' साठी लिहिलीत तर बहार येईल.
ता.क. कोहमसाहेब,  या आगंतुक सूचनांकडे आपण क्षमाशील दृष्टीने पहावे ही विनंती.