'घरात कुत्रा आणला तर मी ह्या घरात क्षणभरही राहणार नाही.'
ह्या, माझ्या सुविद्य, पत्नीच्या धमकीवर माझ्यात आणि माझ्या मुलात जी नजरानजर झाली त्यातून, माझी इच्छा नसतानाही, 'मग लवकरात लवकर आणूयाच' असा संदेश चूकून गेला.
काही सेकंदांच्या अटोकाट प्रयत्नांनतर जो हास्यस्फोट झाला तो नंतर पत्नीच्या संतापाला धूप न घालता १५-२० मिनिटे चालू होता.
(अजूनतरी पत्नी आमच्या घरीच आहे.)