कविता चांगली आहे.
टोकरणे म्हणजे मला वाटते, टोकदार वस्तूने टोचून (जखम, खपली वगैरे) उचकटणे. (बाहेर जाताना 'कुठे जाताय' असे विचारलेले कित्येकजणांना आवडत नाही. त्या विचारण्याच्या क्रियेलाही ते लोक 'टोकणे' किंवा 'टोकरणे' असे म्हणताना मी ऐकलेले आहे. ते टोक(र)णेही ह्या टोकरण्याच्या जवळ येते असे मला वाटते.)
संपूर्ण कविता गा-गागागागा-गागागागा-गागा अशी आहे. फक्त दुसरी ओळ तशी नाही ते बाकी सर्व ओळी वृत्तात बसत असल्याने खटकते.
ते धूसर काही दूर स्वप्नसे दिसते.
असे काही असते तर बरे वाटले असते, असे वाटते. चू. भू. द्या. घ्या.