महेशराव,
मात्रावृत्तात कविता लिहिण्याचा प्रयत्न करत असताना ही कविता लिहिली. त्यामुळे दुसऱ्या ओळीत दोन मात्रा कमी पडताहेत हे लक्षातच आलं नव्हतं. ते सांगितल्याबद्दल तुम्हाला अनेक धन्यवाद.
दुसरी ओळ "मज धूसर काही दूर स्वप्नसे दिसते"  अशी लिहिल्यास ही चूक सुधारली जाईल असे वाटते. 
टोकरणेच्या बाबतीत जखम टोकरणे हा अर्थ अभिप्रेत होता.  आपण सांगितलेला दुसरा अर्थ मला माहीत नव्हता. तो सांगितल्याबद्दल आभार!
पुन्हा एकदा धन्यवाद.
--अदिती