ह्या सॉफ्टवेअरने नवरा-बायकोंना (लग्नापासून आजपर्यंतच्या) एकमेकांबद्दलच्या बदलत्या भावना वाचता येतील (अर्धे तरी स्त्री-पुरुष घटस्फोटित...).

आपल्या घरी आलेल्या आपल्या जीवश्चकंठश्च मित्राच्या आपल्या बायको बद्दलच्या आणि त्याच्या बायकोच्या आपल्या बद्दलच्या 'खऱ्या' भावना 'उघड' होऊन पती-पत्नी हे विश्वासाचे नाते किती पोकळ असते ह्याचा साक्षात्कार होईल. छे... छे.... छे... ह्या सॉफ्टवेअरवर तातडीने जागतिक (की अगतिक?) बंदी आणली पाहिजे.