मुंबईत उपाहारगृहामध्ये जो चहा मिळतो तो मात्र मला अजिबात आवडत नाही. गार असतो आणि सगळीकडे एकच चव.

मनोगतावरील अल्पसंख्याकांच्या भावना दुखवू नका.

मुंबईतील 'शंकरविलास' ह्या चहा-चेनचा आस्वाद कधी घेतला असता तर वरील विधान केले नसते. मला वाटते तुम्हाला उडप्याकडचा चहा म्हणायचे आहे. त्याची चव वेगळी असते पण त्याचे 'ट्यूनिंग' जमले की तोही आवडतो. मुंबईतल्या रेल्वे स्टेशनवरच्या जाड दगडी कपातील आणि कोणे एकेकाळी पांढऱ्या असणाऱ्या काळ्या कपड्यातून गाळलेल्या चहाची खुमारी काय वर्णावी? धोधोधोधोधोधोधोधो पाऊस कोसळत असावा गाड्या बंद किंवा लेट असाव्यात मित्रांसमवेत 'खड्ड्यात जाऊदे ऑफिस' मस्तपैकी पिक्चर टाकूया असा ठराव पास झालेला असावा आणि रेल्वेच्या चहाचा आस्वाद घ्यावा. (नंतर सिगरेट....ओढत असाल तर). रोम रोम पुलकित होते.  

मुंबईत मला तरी कुठे 'थंड' चहा मिळालेला नाही. मीही खूप चहाड्या आहे.