लोहाचे प्रमाण पाचपट अस्णारा तांदूळ आणि 'अ' जीवनसत्वाची भरपूर मात्रा असणारा 'गोल्डन राईस' या जैवतंत्रज्ञानाच्याच देणग्या आहेत. भारतात सुमारे साठ टक्के बालिका आणि महिलांना आयुष्यात कधी ना कधी ऍनिमियाचा त्रास होतो असे वाचले होते. लहान वयात लग्न, गर्भारपण आणि अपत्यप्राप्ति हेही त्यामागचे एक कारण असावे. हा लोहसंपन्न तांदूळ त्यावरचा प्रभावी उपाय ठरु शकेल. भारतात 'अ' जीवनसत्वाच्या अभावी लक्षावधी बालके कायमची अंध होतात. 'गोल्डन राईस' मुळे या बालकांची दृष्टी वाचवता येईल.

दुर्दैवाने यातले कोणतेही उत्पादन तयार करायला वा वापरायला भारतात अद्याप शासनाची परवानगी नाही.
नेहमीप्रमाणे रंजक माहिती, सागर. 'लोखंड आणि ब्रम्हपदी नाचणे' ही गंमतही आवडली.