केशा, चित्तचा आणि तुझा मी आभारी आहे. तुमच्यामुळे माझ्या त्या जुन्या, विस्मृतीत गेलेल्या रचनेस दोन-चार नवे वाचक लाभतील. बाकी विडंबन नेहमीप्रमाणे झकास झाले आहे हे वेगळे सांगणे न लगे!

मज पटावे हे कसे पण सांग तू
झाड पडले त्यास कारण कावळा!
 - वा वा.

रोजचे वेणीफणी करणे तिचे
तासभर चाले तिचा हा सोहळा
 -  पुरुषजातीची  सनातन तक्रार आहे बाबा  ही. इलाज नाही त्याला. (यालाच बहुधा महाभारतकारांनी "पुरुषस्य दुर्भाग्यम्" असे म्हटले आहे.)

सांगतो आहे तुम्हाला आज मी
वाटतो तितका न "केश्या" सोवळा
- मनोगतावर केश्याला सोवळा समजणारा कंदील घेऊन शोधावा लागेल. चिंता करू नकोस, तुझी 'कीर्ती' दिगंत पसरलली आहे.