स्पंदरा द्यावा असे मलाही वाटले होते, पण त्याचे दुसऱ्या एका असभ्य शब्दाशी नादसाम्य असल्याने मी क्रिकेटसमालोचन करणाऱ्या मंदिरा नावाच्या सुप्रसिद्ध 'तारके'ची आठवण करून देणारा म्हणून स्पंदिरा सुचवला. बंदनी पेक्षा बंदिनी, वाहनी पेक्षा वाहिनी, तारणी पेक्षा तारिणी कानाला अधिक गोड लागतात म्हणून स्पंदिणी.
लेखात वापरलेल्या शब्दाचा अर्थ अनुमानधपक्याने कळू शकतो, पण शब्दकोशात ही सोय नसल्याने वाद्याच्या कंप पावणाऱ्या तारा की कंप पावणारी आकाशातील चांदणी हा गोंधळ टाळणे सहज शक्य असल्याने 'तारा' ऐवजी 'तारका' वापरल्यास बरे वाटले असते. म्हणून मी तसे सुचवले. टीका करण्याचा उद्देश नव्हता.,