प्राणी हा शब्द रामदासस्वामींच्या काव्यात अनेकदा डोकावतो, त्यामुळे वरील श्लोकाचा कर्ता रामदासस्वामी असण्याची दाट शक्यता.
आणखी पहा:
शेत वाडे घर ठावो ।प्राणी जीवीं धरी हावो ॥
माता पिता बहिणी भ्राता । कन्या पुत्र आणि कांता ॥
व्याही जावई आपुले । इष्ट मित्र सुखी केले ॥
दास म्हणे वो शेवटी । प्राप्त झाली मसण-वटी ॥
जन्मभरी शीण केला । अंत-काळीं व्यर्थ गेला ।।
काया स्मशानी घातली । कन्या पुत्र मुरडलीं१ ॥
घर वाडा तो राहिला । प्राणि जातसे एकला ॥
धन धान्य तें राहिलें । प्राणी चर्फडित गेले ॥
इष्ट मित्र आणि सांगाती । आपुलाले घरा जाती ॥
दास म्हणे प्राणी मेले । कांही पुण्य नाहीं केलें ॥
१:- परतलीं.