अमेरिकायणाचे भाग वाचते आहे, मजा वाटली. चांगले लिहिता, पुढचे भाग वाचण्यास उत्सुक.
मला तर त्यावेळी ह्या पिवळ्या उजेडाची विलक्षण चीड आली होती. त्या पिवळ्या उजेडाने घराचं वातावरण दु:खी वाटू लागतं.
हाहा! अगदी माझ्या मनातल्यासारखं बोललात. मलाही पूर्वी असंच वाटायचं की या पिवळ्या दिव्यांच्या प्रकाशात किती भकास वाटतं. जर्सी सिटी इ. ठिकाणी बरं असतं हो, माणसांत असल्याचा भास तरी होतो. आमच्या मिडवेस्टला जिथे माणसंच दिसत नाही तिथली कल्पना करा, पण हा सगळा सवयीचा प्रश्न असतो. माणसाला नवं स्वीकारायचं नसतं, जे जुनं आहे ते तोडकंमोडकं, साधसुधं असेल तरी जपून ठेवायचं असतं. पिवळ्या दिव्यांचही असंच आहे.
आम्ही याबाबत उलट केलं, इथे हेच चालतं, हे स्वीकारून पाहायचे ठरवले. (अर्थात, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, त्यात चूकबरोबर काही नाही.) आता आम्हाला पिवळ्या दिव्यांची सवय झाली आहे. भारतात गेलं की घरातल्या ट्यूबलाईटस पाहून भगभगीत प्रकाशात आल्यासारखं वाटतं. डोळ्यांना त्रास होतो, इतका प्रकाश नकोसा वाटतो कारण शेवटी सवयीचा प्रश्न असतो.