अनंत मनोहरांचे एकच अप्रतिम पुस्तक वाचलेले आहे -'गलोल'.
'राब' वाचण्याची, शक्य झाल्यास विकत घेण्याचे उत्सुकता निर्माण झाली आहे.
मग बुडाखाली फटफटी, जीप, आंबाशिटर आदी वाहने, घरात/भावकीत सरपंच, आमदार, झेड पी अध्यक्ष, राजकारणी, आणि आपापल्या कुळांचा (ब्याण्णव / शहाण्णव/ अठ्ठ्याण्णव आदी) ज्वलंत अभिमान असे साचेबद्ध चित्र उभे करण्यात दुर्दैवाने मराठीतील बहुतेक 'साहित्यिक' यश पावले आहेत. 'राब'मधील हे मराठे 'माणसे' वाटतात. मिशांचे आकडे पिळून खुर्च्या आणि बाया नासवत हिंडणारे हिंदुराव झेंडे पाटील किंवा बंधुराव धोंडे पाटील किंवा तत्सम राक्षस नाहीत.
साहित्य हे आयुष्याचीच प्रतिमा असल्याने बहुतेक ठिकाणी खलनायक रंगवताना डावभर डांबर जास्त पडते आणि नायकाला एक चुन्याचा हात जास्त बसतो. त्यामुळे खलनायकाचे पात्र हे ज्याला 'पायतानानं ईस हानून येक मोजावी' अश्या लायकीचेच रंगवले जाते. 'राब'मधले खलनायक फारच माणसातले आहेत. फारच 'आपल्यातले' आहेत.
हे विशेष पटले आणि आवडले. आणखी असेच लिहावे.