आत्मज्ञान आणि आत्मभान असलेली माणसे विरळा, असे साहित्यिक तर गुलबकावलीच्या फुलाइतके दुर्मिळ. स्वतः:च्या लेखनाचे त्रयस्थपणे आणि यथायोग्य मूल्यमापन करणे फार कमी लोकांना जमते. आपण अशांतले एक आहात याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन. आपल्या लेखनाचा दर्जा व मोल आपण जाणून आहात. इतरांच्या प्रतिसादांवर व अभिप्रायांवर असे अवलंबून राहू नका, निराश होऊ नका. स्वान्त सुखाय लिहीत राहा.रवींद्रनाथ ठाकुर सांगून गेलेच आहेत : " एकला चालो रे..." आपले साहित्य कोणत्या प्रतीचे आहे हे आपण वर लिहिले आहेच, त्या मताशी खंबीर राहा. इतर मनोगती काय म्हणतात ( खरे तर काय म्हणत नाहीत) याने चित्त विचलित होऊ न देता साहित्यसेवा अहर्निश चालू ठेवा. भगवान के घरमें (और मनोगतमें) देर है, अंधेर नही!