वरदा,

पृथ्वीच्या अक्षाचा प्रतलाशी असणारा कोन आणि त्याचे 'डुगडुगणे' यांचा, पृथ्वीच्या ऋतुमानाशी असणारा संबंध, चंद्राच्या वस्तुमानाचे आपल्या 'असण्या'शी असलेले नाते, ह्या सर्व गोष्टी माहितीपूर्ण तशाच अत्यंत रोमांचकारी आहेत. हे सर्व, मुलभूत, मुद्दे शालेय जीवनात विस्तृत (किंवा संक्षिप्त) प्रमाणात शिकवले गेले नाहीत. (निदान माझ्यातरी) हे आपल्या अशक्त शिक्षणपद्धतीचेच द्योतक मानावे लागेल. असो.

आपल्या लेखनमालेने ज्ञानात (या वयात का होईना...) मौलीक भर पडत आहे. आपल्या पुढील लेखाची वाट पाहात आहे.

धन्यवाद.