>>मला वर उल्लेखिलेला प्रॉब्लेम नव्हता कारण आई व्यवसाय करणारी असल्याने मल जेवणापासुन सारं काही बनवता येत होतं<<
बरोबर आहे.
सर्वसाधारणतः ज्या घरातल्या आया नोकरी/कामधंद्याच्या निमित्ताने घराच्या बाहेर असतात त्यांची मुलं एकुणातच अनेक जबाबदाऱ्या अंगावर घ्यायला लवकर शिकतात. लवकर स्वावलंबी होतात. अगदी स्वतःच्या कपड्यांची निगा राखणे, कपाट/खोली आवरणे, घर सांभाळणे, जवळपासची कामे करणे इत्यादी. याउलट ज्या बायकांना घराच्या पलिकडे विश्व नसते त्यांचे मुलगे चहासुद्धा स्वतःचा स्वतः करून घेऊ शकत नाहीत. काही मुली सुद्धा. पण हे प्रमाण मुलांच्यात जास्त.

माझी रूममेट होती, पहिल्यांदा देशातून अमेरीकेत पोचली तेव्हा तिला कुकर लावणे किंवा भात शिजवणे किंवा भाजी फोडणीस टाकणे हे ही माहित नव्हते. आणि मला इयत्ता ६ वीतच या गोष्टी नीट येऊ लागल्याबद्दल मला स्वतःबद्दल प्रचंड काहीतरी छान वाटले आणि नंतर मनातल्या मनात मी आईचे आभारही मानले.

या विषयावर अजून खूप काही आहे पण ते नंतर...