दमदार साहित्य रसिकांना आवडत नाही, असे होतच नाही.
साहित्यावर भरपूर प्रतिसाद आले नाहीत, तर लगेचच टोकाचा निष्कर्ष काढू नये, किंवा दमदार साहित्य लोकांना आवडत नाही, या गृहितावर चर्चा बेतली जाऊ नये, असे मला वाटते. दुसरे, प्रतिसादांच्या केवळ संख्येवर साहित्याचा दमदारपणा तोलला जाऊ नये. चर्चेच्या प्रतिसादातूनदेखील चर्चेचा नेमका सूर कायम राहावा, आणि काहीतरी निष्कर्ष पुढे यावा ही अपेक्षा.
सुख आणि दुख़ाच्या सहित्यातील छटा कालातीत असतात. भौतिकार्थाने सुख-दुक्खाच्या व्याख्या बदलल्या, तरी...
आणि, जमाना बदलला, तर, ना.सी, अत्रे यांची जागा नव्या, बदललेल्या जमान्याचा कुणीतरी घेईलच. ती जागा रिकामी थोडीच राहणार असते?
सहित्याचा दमदारपणा वाचकांना जाणवला, तर त्याचे स्वागत होतेच, असा साहित्यविश्वाचा नेहमीचा अनुभव आहे.