ना. सी. फडके यांची लघुकथा अत्यंत तंत्रशुद्ध असल्याची कबूली त्यांच्या घोर विरोधकांनीही दिली आहे हे विसरून चालणार नाही.
तसेच ते साहित्य सौंदर्याचे गाढे अभ्यासक होते हेही महत्त्वाचे आहे.
त्यांच्या लेखनाला मराठी साहित्यातील मैलाचा दगड म्हटले जाते.  आज त्यापद्धतीचे लेखन पैशाला पासरी (आणि त्यामुळे जुनाट) झाले असले तरी त्यांनी हा पंथ स्थापन केला - नंतरच्या अनेक लेखकांनी त्यांचे अनुकरण केले. आज तो मैल मागे पडला असला तरी त्यांच्या काळात कथा-कादंबऱ्यांचे ते अनभिषिक्त सम्राट होते.