झुलेलाल जी,

‘हॆरी पॊटर’  हा  साहित्याविश्वातला  एक  चमत्कार  आहेच,  आणि  आजचे गतिमान ग्लोबलायझेशन  आणि  मार्केटिंगची  जादू  यांमुळेच  हा  चमत्कार साध्य झाला आहे.
जग चारपाच दशकांपूर्वी  आजच्यासारखे जवळ आले असते, तर ?....

या आपल्या मताशी मी संपूर्णत: सहमत आहे. दर्जेदार, अद्भूतरम्य  वाड़गमयाची मराठीत किंव अन्य भारतीय भाषांमध्ये वानवा नाहीच. चांदोबाची मोहिनी अजूनही टिकून आहेच. मात्र प्रसिद्धी आणि विक्री-व्यवस्थापन तंत्र, तसेच  मुद्रित  साहित्याच्या  पाठोपाठ कथेचे चित्रफितींच्या माध्यमातून झालेले सादरीकरण, हे खरे हॅरी पॉटर च्या यशाचे गमक आहे. 
हॅरी पॉटर जितका पाहिला गेला तितका वाचला गेला नाही हे सत्य ध्यानात घेण्यासारखे आहे.