सागर,

प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. शनिवार आणि रविवार कार्यालयीन सुट्टी असल्याने प्रतिसाद देऊ शकलो नाही. असो.
मात्र रात्र हे नाट्य एका शयनगृहामध्ये घडणारं नाट्य.नाटकात फक्त दॊन पात्रं.
नाटकातील बराचसा संवाद हा एका बेडवरच घडतो.
त्यामुळे एका तासाहून अधिक वेळ प्रेक्षकांना नाटकामध्ये गुंतवून ठेवणं हे जेवढं कलाकारांचं कौशल्य आहे,
तेवढीच त्याला ध्वनी आणि प्रकाश योजना ही सफाईदार हवी. मात्र रात्र इथं पुर्णपणे यशस्वी ठरतं.
प्रत्येक घटना शब्दांत सविस्तर पणे सांगणं अवघड आहे. कारण तो अनुभवण्याचा विषय आहे.
साख्ररेचा गोडवा शब्दांत कितीही सांगितला, तरीही साखर खाऊन पाहिल्याशिवाय त्याची चव कशी काय कळणार?
तुम्ही हे नाटक पाहा, म्हणजे तुम्हांस त्याची प्रचिती येईल.
आणि तुम्ही हे नाटक पहिले असूनही जर तुम्हाला प्रकाश योजना फारशी आवडली नसेल तर ते तुमचे वैयक्तिक मत असू शकते. मी माझे मत लेखात मांडले आहेच.